बिहारमध्ये न्यायालय परिसरात दरोडेखोरांनी केला बॉम्बस्फोट

हाजीपूर (बिहार) – बिहारच्या हाजीपूर कोर्ट परिसरात एका कैद्याला पळवून नेण्यासाठी मंगळवारी सकाळी दोन गावठी बॉम्बचा स्फोट करण्यात आला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली असून कैद्याला पळून जाण्याचा प्रयत्न करताना परत ताब्यात घेण्यात आले.

हाजीपूर येथे संत लाल सहा नावाच्या दरोडेखोराला कोर्टात हजर करण्यात येणार होते. त्याला घेऊन पोलिसांची व्हॅन कोर्टाच्या परिसरात पोहोचली त्याच वेळी दोन गावठी बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलीस अधीक्षक सुरेश चौधरी यांनी सांगितले.

स्फोटानंतर झालेल्या धुराचा फायदा घेऊन पळाला. पण तो फार दूर जाण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच या परिसरातील सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाच्या परिसरात आणखी एक जिवंत गावठी बॉम्ब सापडला आहे. तसेच एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.