
नवी दिल्ली- देशातील आर्थिक मरगळ झटकण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी रात्री विविध निर्णय जाहीर केले. सरकारने संरक्षण क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्के करण्याचा निर्णय घेतला. त्याच बरोबर दूरसंपर्क क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांवरुन 100 टक्के करण्यात आली आहे.तसेच गॅस रिफायनरी, कमोडिटी एक्स्चेंज, पॉवर ट्रेडिंग आणि स्टॉक एक्स्चेंज आदी क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.
