करीना करतेय वेगळया प्रकारे प्रमोशन

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या आगामी काळात येत असलेल्या ‘सत्याग्रह’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात खूपच व्यस्त आहे. ‘सत्याग्रह’ या सिनेमाचे प्रमोशनसाठी तिने आता वेगळीच शक्कल लढवली आहे. करिना आता या सिनेमाच्या प्रमोशनचे काम मेकअपविना करीत आहे. त्या‍मुळे या सिनेमाच्या प्रमोशनला सर्वत्र गर्दी होत आहे.

गेल्‍या काही दिवसांपासून तसे पाहिले तर बॉलीवूडमध्ये नवनवीन योजना आणल्या जात आहेत. रिअलिटी शो, टि.व्ही मालिका, पुरस्कार सोहळे यांद्वारे आता सिनेमाची जाहिरात केली जात आहे. मात्र, ‘सत्याग्रह’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी अभिनेत्रींना मेकअपविना प्रेक्षकांसमोर आणण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अभिनेत्री करीना कपूरने हा सिनेमा मेकअपविना केला आहे.

सध्या सर्वत्र करिना मेकअपविना ‘सत्याग्रह’ सिनेमाचे प्रमोशन करीत आहे. ‘सत्याग्रह’ या सिनेमात करीनाने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट राजनैतिक नाट्यावर आधारित असून अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. ‘सत्याग्रह’ हा सिनेमा पुढील महिन्यागत ३० तारखेला रिलीज होत आहे.

Leave a Comment