सतीश आणि अतुलचा नवा सिनेमा ‘पोपट’

नुकताच येऊन गेलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय सिनेमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा नवीन सिनेमा येऊ घातलाय.‘प्रेमाची गोष्ट’या सिनेमाच्या धमाकेदार यशानंतर पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी आणि दिग्दर्शक-लेखक सतीश राजवाडे ‘पोपट’ या सिनेमासाठी एकत्र येत आहेत. सोबतच या सिनेमात अमेय वाघ, सिद्धार्थ मेनन,केतन पवार, अनिता दाते, नेहा शितोळे, मेघा घाटगे या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘मिराह एन्टरटेनमेंट प्रा.लि. प्रस्तुत आणि सिट्रस चेक इन्स ह्यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या ह्या चित्रपटाची निर्मिती `मिराह एन्टरटेनमेंट’ने केली आहे. नुकतीच ‘पोपट’ या सिनेमाची घोषणा दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी एका सोहळ्यात केली. येत्या २३ ऑगस्टला हा सिनेमाच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीत निवडक आणि दर्जेदार भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अतुल कुलकर्णी याची एकाच वर्षात एकच निर्माता आणि दिग्दर्शकाकडे दोन चित्रपट स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. वेगळ्या भूमिकांसाठी अतुल प्रसिद्ध आणि वेगळ्या धाटणीच्या सिनेमांचं दिग्दर्शन करण्यासाठी सतीश प्रसिद्ध आहे. त्यामुळे नक्कीच काहीतरी धमाल आणि वेगळ्या धाटणीचं या सिनेमातून बघायला मिळेल अशी अपेक्षा करण्यात काहीच हरकत नाही. चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय केळकर यांनी लिहिले असून कथा सतीश राजवाडे यांचीच आहे. भास्कर सामला यांचे छायाचित्रण तर अविनाश-विश्वजीत या धमाल संगीतकार जोडीचे संगीत दिले आहे.

Leave a Comment