चीन उभारतोय जगातील सर्वात अत्याधुनिक वेधशाळा

बिजिग दि.१३ – भारताच्या सीमेजवळ तिबेट भागात चीनने आशियातील सर्वोत्तम खगोलशास्त्रीय वेधशाळा उभारण्यास सुरवात केली असून ही वेधशाळा जगातील सर्वात आधुनिक वेधशाळा असेल असे सांगितले जात आहे. वेधशाळा उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर जगभरातील संशोधक शास्त्रज्ञ या वेधशाळेकडे आकर्षित होतील असा विश्वासही चीन सरकारने व्यक्त केला आहे.

ही वेधशाळा सम्रुद्रसपाटीपासून ५००० मीटर उंचीवर असणार आहे व हाच या वेधशाळेचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. इतक्या उंचीवर अशी अत्याधुनिक वेधशाळा उत्तर गोलार्धात तरी नाहीच. या वेधशाळेची निरीक्षण क्षमता हवाईतील मौना की वेधशाळा व चिलेतील अँडेज वेधशाळेच्या तोडीची असणार आहे. इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनचे अध्यक्ष नोरिओ कैफू यांनी या येधशाळेत बसविण्यात येणार्याइ दुर्बिणीमुळे सौर मंडळातील तारे, तार्यांाची निर्मिती, त्यात होत असलेले बदल हे बारकाईने टिपता येणार आहेत असे सांगितले.

Leave a Comment