सिडनी: विजय झोलच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील टीम इंडियांच्या युवा ब्रिगेडचा दबदबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसून येतो आहे. टीम इंडियांच्या युवा संघाने अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. तीन विकेट्स घेणारा दीपक हुडा सामनावीराचा, तर मालिकेतल्या सहा सामन्यांत सर्वाधिक २९३ धावा ठोकणारा कर्णधार विजय झोल मालिकावीराचा मानकरी ठरला.
एकीकडे धोनीच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवून वेस्ट इंडिजमधली तिरंगी मालिका जिंकली, तर दुसरीकडे विजय झोलच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील संघाने ऑस्ट्रेलियातील वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियात झालेल्या टॉप एण्ड अंडर नाईन्टीन मालिकेत भारतीय युवा संघाने विजेतेपद पटकावले. भारतीय युवा संघाने अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवला.
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा अवघ्या ७५ धावांतच खुर्दा उडवला. दीपक हुडाने २२ धावांत ३ विकेट्स काढल्या. तर अभिमन्यू लांबा, मिलींद आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मग भारताने ७६ धावांचे लक्ष्य १५ षटके आणि तीन चेंडूंतच पार केले.