स्फोटाची धमकी देणारे ट्विट कराचीतून

मुंबई- बोधगया येथे झालेल्या स्फोटांनंतर मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारे ट्विट कराचीतील सायबर कॅफेतून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरक्षा यंत्रणांना हे अकाउंट बोगस असल्याचा संशय आहे. ‘१३/७’च्या मुंबईतील साखळीस्फोटांना शनिवारी दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे मुंबई शहरात विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे. शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबसत ठेवण्यातत आला आहे. याठिकाणी येणा-यांची कसून तपासणी केले जात आहे. स्थानिक पोलिसांसह शीघ्र कृती दलालाही सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

रविवारी बिहामरमधील बोधगया येथे झालेल्या साखळी स्फोटाची जबाबदारी व मुंबईला टार्गेट करणारे कथित इंडियन मुजाहिदीनचे अकाउंट ट्विटरने बंद केले. त्यालनंतर पुन्हाट आणखी एका अकाउंटवरून ४८ तासांत म्हणजेच १३ जुलैला मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचे ट्विट करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांना हे अकाउंट बोगस असल्याचा संशय आहे. ‘१३/७’च्या मुंबईतील साखळीस्फोटांना दोन वर्षे पूर्ण होत असल्यामुळे शहरात विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे आहे.

या सर्व अकाउंटमध्ये इंग्रजीच्या ब-याच चुका आहेत. विशेष म्हणजे त्यात इंडियन मुजाहिदीन या संघटनेची स्पेलिंगही चुकीची लिहिण्यात आल्यामुळे हे अकाउंट बोगस असल्याचा संशय आहे. मात्र नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता कोणताही धोका पत्करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह शीघ्र कृती दलालाही सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. तसेच फोर्सवनसारख्या सुरक्षा यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Leave a Comment