सनीसारखी पत्नी नको- तुषार कपूर

बॉलीवूडमधील अभिनेता तुषार कपूर गेल्या काही दिवासांपासून पोर्न स्टार सनी लियोन सोबत काम केल्याने चांगलाच चर्चेत आला आहे. तुषारने सनी सोबत ‘शूटआउट एट वडाला’ या सिनेमात काम केले आहे. या सिनेमा दरम्यान या दोघांत जवळीकता आल्याची चर्चा होती. त्यामुळे आगामी काळात तुषार सनी सारख्या अभिनेत्रीसोबत लग्न करेल का असा प्रश्न‍ सर्वांना पडला होता. मात्र त्याचे उत्त‍र खुद़द तुषारने नकारार्थी दिल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

बॉलीवूडमधील ‘जंपिंग जैक’ म्हणून अभिनेता जितेंद्र यांनी चांगली इमेज कमावली आहे. काहीकाळ त्यांनी बॉलीवूडमध्ये सुपर स्टार म्हणून गाजवीला होता. त्याकाळी बरेच सिनेमे गाजले होते. त्यांचा मुलगा तुषार कपूरला मात्र जादा सफलता मिळाली नाही. त्या‍नी केलेला ‘डर्टी पिक्चर’ थोडासा गाजला.

त्याचनंतर ‘शूटआउट एट वडाला’ हा सिनेमा रिलीज झाल्याने तुषार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी पत्रकारांनी त्याला लग्नाबाबत छेडले असता तुषार म्हणाला, ‘मी आगामी काळात लवकरच विवाह करणार आहे, मात्र पत्नी म्हणून सनी लियोन सारख्या अभिनेत्रीशी नव्हे तर सौज्वळ मुलीशी वि‍वाह करणार आहे.’

Leave a Comment