दिल्ली गँगरेप – ३ परदेशी वृत्तसंस्थांना वार्तांकनाची परवानगी

नवी दिल्ली दि.१२ – गतवर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीत घडलेल्या गँगरेप प्रकरणाने जगभरात खळबळ उडविली होती. या केसची सुनावणी आजपासून सुरू होत असून त्याचे वार्तांकन करण्यासाठी रॉयटर, असोसिएटेड प्रेस व अेएफडी (फ्रान्स एजन्ट प्रेस) या तीन परदेशी वृत्तसंस्थांना या केसचे वार्तांकन करण्याची परवानगी दिल्ली हायकोर्टाने दिली आहे. अर्थात वैयक्तीक पातळीवर कोणताही परदेशी पत्रकार हे वार्तांकन करू शकणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मीनाक्षी लेखी यांच्या सहकार्याने मेंबर्स ऑफ फॉरिन कॉरस्पाँडंट क्लबतर्फे न्यायालयाला हे वार्ताकन करण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज दाखल करण्यात आला होता. या संस्थांची मासिके, नियतकालिके आणि वर्तमानपत्रे अन्य देशांबरोबरच भारतातही उपलब्ध आहेत तसेच प्रेस इन्फर्मेशन ब्युरो या वृत्तसंस्थांना ओळखते तेव्हा ही परवानगी मिळावी असे या अर्जात नमूद करण्यात आले होते. त्यावर न्यायाधीश राजीव शकधर यांनी ही परवानगी देण्यात येत असल्याचे सांगितले.

मार्च २२ रोजीच राष्ट्रीय प्रिट व इलेक्ट्रोनिक मिडियालाही या केसच्या वार्तांकनाची परवानगी दिली गेली आहे.