अनुष्का-दीपिकाची गळाभेट

बॉलीवुडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. दोघीपण ए‍कमेकांना बोलतच नाहीत तर एकमेकींकडे साध्या बघतही नाहीत. या दोघीमधील वादाचे कारण मात्र वेगळेच आहे. अभिनेता रणवीर सिंह याच्यात असलेल्या जवळीकतेमुळे या दोघीत वाद आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा अभिनेता रणवीर सिंह सोबत डेटिंग करीत असल्याचे अनेक जणांनी पाहिले होते; पण आता आजकल रणवीर सिंह दीपिका सोबत खूपच वेळ घालवीत असल्याची चर्चा ऐकावयास मिळते. रणवीर सिंह सोबतच्या अफयेरच्या चर्चेमुळे या दोघीतील संबध गेल्या काही दिवसांपासून चांगलेच बिनसले आहेत. दोघीपण एकमेकांना बोलण्याचे ही टाळत आहेत.

चार दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खानने मकाओमध्ये पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये अनुष्का आणि दीपिका दोघीपण अचानक समोरासमोर आल्या. त्यामुळे काही काळ तर दोघीना काय करायचे तेच सुचले नाही. अचानक झालेल्या या भेटीने दोघींनी पण एकमेकाच्या गळयात गळे घातले. त्यानंतर दोघींनी एकत्रित डान्सही केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यावेळी अनुष्काने सिंपल कपडे घातले होते तर दीपिकाने हॉट ड्रेस परिधान केला होता.

Leave a Comment