ठाण्यात जोरदार पाऊस; वाहतुकीचा खोळंबा

ठाणे: ठाण्यात शुक्रवारी सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी ठाणे शहरात दोन तासांत ६१.५ मिली मीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कळवा-मुंब्र दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी, आल्याने स्लो ट्रॅक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर लावल्यालने ठाण्यात वंदना टॉकीज परिसरात गुडघाभर पाणी, पाणी साचले होते. त्यावमुळे या परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला असून सिव्हिल हॉस्पिटल, परिसारतील उथळ भागात असलेल्याळ घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा मोठा परिणाम सेंट्रल रेल्वेच्या वाहतुकीवर झाला.ठाण्याहून दादरकडे वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मध्य रेल्वेचा स्लो ट्रॅक ठाणे जिल्ह्यात जवळ-जवळ बंद आहे. आगामी काळात पावसाचा जोर ओसरल्यावर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment