मनीषा करणार ऑक्टो्बरपासून कामाला सुरूवात

अभिनेत्री मनीषा कोइराला कॅन्सरची ट्रीटमेंट घेतल्यांनतर आता पुर्णपणे फिट झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरूवात करणार असल्याची माहिती तिनेच शेयर केली आहे. आतापर्यंत तिने ट्रीटमेंटच्या‍वेळी आलेला अनुभव सर्वांसमोर शेयर केला आहे. कॅन्सर विरोधातील लढाई जिंकल्याने मनीषा कोइराला सध्या खूपच खूष आहे.

अभिनेत्री मनीषा कोइराला कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू असताना ती कधीच नाराज झाल नाही. ती नेहमीच खूष होती. तिने कधीच निराशा दाखवली नाही. त्यामुळेच ती या जीवघेण्या आजारातून परतली आहे. जून महिन्यातच ती अमेरिकामधून ट्रीटमेंट घेउन वापस आली आहे. सध्या ती घरीच इंजॉय करीत आहे. सध्या ती मॉनसूनचा आनंद घेत असून यावेळी ती आवडणारे सिनेमे पाहत आपला वेळ घालवीत आहे.

याबाबत बोलताना मनीषा म्हॉणाली, ‘ मला खूप थकवा जाणवत होता. पोटाच्या पण तक्रारी जाणवत होत्या. एक दिवशी मी रूटीन चेकअपला गेले तर एका टेस्टनंतर आलेल्या रिपोर्टने माझी झोपच उडाली होती. मी लगेचच जसलोक हॉस्पिटलमध्ये अडमिट झाले. त्यानंतर न्यूयॉर्क मध्ये मी उपचार घेतले. या काळात आईसोबतच काही डॉक्टर फ्रेंडसने पण खूप मदत केली.’