बिपाशा करणार टीवी शो होस्ट

अभिनेत्री बिपाशा बसूने आतापर्यंत तिच्या बोल्ड भूमिकेने सिनेमात लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळेच आता तिने छोटया पडद़याकडे वळण्याचे ठरविले आहे. बिपाशा बसु आता लवकरच एक टीवी शो मध्ये होस्ट म्हणून झळकणार आहे. हा शो अमेरिकेतील एक पॉप्युलर टेलीविजन शो ‘अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडल’ चे इंडियन वर्जन आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एका फेमस टीवी चैनलने याचे राइट्स खरेदी केले आहेत. त्यामुळे या शो ची सर्वच तयारी पूर्ण झाली आहे.बिपाशाच्या जवळील मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गेम शो वेळी फिट दिसण्यासाठी सध्या ती ग्रूमिंग आणि मोटिवेशन क्लास करीत आहे. या शो चा संपूर्ण हिस्सा बिपाशाच असणार असल्याचे समजते. या शो साठी सध्या ऑडिशंस सुरू करण्यात आली आहे.

या शो ची शूटिंग ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. हा शो जवळपास तीन महिने चालणार आहे. या शो मध्ये बिपाशाशिवाय अन्य सिनेस्टार्स देखील सहभागी होणार आहेत. तसे पाहिले तर अभिनेत्री बिपाशा बसू आगामी काळात येत असलेल्या‍ दिगदर्शक विक्रम भट्टच्या ‘क्रिएचर’ या सिनेमातून झळकणार आहे.

Leave a Comment