अगला टार्गेट मुंबई – इंडियन मुजाहिद्दीनचा इशारा

नवी दिल्ली दि.१० – बोधगयेनंतर आमचे पुढचे टार्गेट मुंबई आहे असा इशारा इंडियन मुजाहिद्दीनच्या ट्विटरवरील अकौंटवरून देण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच अकौंटवरून बोधगयेतील स्फोटांची जबाबदारीही स्वीकारली गेली आहे. विशेष म्हणजे ६ जुलै रोजीच म्हणजे प्रत्यक्षात बोध गयेत स्फोट होण्याअगोदरच या अकौंटवरून बोध गयामे नौ धमाके किए असे ट्वीट केले गेले होते असेही स्पष्ट झाले आहे.

याच अकौंटवर हमारा अगला टार्गेट मुंबई है, रोक सको तो रोक लो असाही इशारा दिला गेला आहे. सात दिन बाकी है असेही यात पुढे म्हटले गेले आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या या अकौंटवर सुरक्षा यंत्रणांची नजर पूर्वीपासूनच असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे या अकौंटवर लक्ष आहे. कॅनडातून हे अकौंट सुरू केले गेले असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.