हॉटेल चेन्स डॉलर्समध्ये बिले आकारणार

मुंबई दि.१० – डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या होत असलेल्या घसरणीमुळे भारतातील पंचतारांकित हॉटेल चेन्ससाठी डॉलर्स अधिक आकर्षक बनले आहेत. परिणामी या हॉटेल चेन्स ग्राहकाकडून डॉलर्समध्येच बिले घेण्याचा विचार करत आहेत. मे पासून रूपयाचे दर १३ टक्कयांनी कमी झाले आहेत आणि त्यात सुधारणा होण्याची सध्या तरी कांही शक्यता दिसत नाही. यामुळे हॉटेल्स पुन्हा डॉलर रेट लावण्याच्या तयारीत आहेत.

लिला कॅम्पस्कीतील वरीष्ठ अधिकारी या संदर्भात बोलताना म्हणाले की अजून आम्ही डॉलर्समध्ये चार्ज करायला सुरवात केलेली नाही. मात्र लवकरच हा निर्णय घेतला जाईल. २००७ साली रूपयाच्या तुलनेत डॉलर वीक होता, तेव्हा आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक हॉटेल्स चेन्सनी रूपयांत दर आकारणी केली होती. आता परिस्थिती बरोबर उलट झाली आहे.

ट्रायडेंट हॉटेल मधील अधिकार्‍यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की रूपयाच्या अवमूल्यनामुळे भारत हा पर्यटकांना सहज परवडणारा देश झाला आहे. सध्या भारतातील पंचतारांकित हॉटेल्समधून असलेल्या ग्राहकांत ६० ते ७० टक्के परदेशी पर्यटकच आहेत. सध्या रूपये आणि डॉलर्स अशा दोन्ही चलनात बिले स्वीकारली जात आहेत. मात्र रूपयातील घरसणीमुळे जे पदार्थ आणि पेये आयात करावी लागतात, त्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. अर्थात रूम्सच्या भाड्यामध्ये अजूनतरी वाढ केली गेलेली नाही. परिस्थीती अशीच राहिल्यास याबाबतही विचार करणे भाग पडणार आहे.

Leave a Comment