मल्लिका शेरावतवर अजामिनपत्र गुन्हा दाखल

वडोदरा – वडोदराच्या एका स्थानिक न्यायालयाने अश्लिलता पसरवण्याचा प्रयत्न केल्याने बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हीच्या विरोधात अजामिन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडोदराच्या या न्यायालयाने अजामिन गुन्ह्याची नोंद करत मल्लिकाला 19 ऑगस्टपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे सांगितले आहे.

बडोदा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष नरेंद्र तिवारी यांनी 31 डिसेंबर 2006 ला मुंबईतील एका पार्टीमध्ये अश्लील नृत्य केल्यामुळे मल्लिका शेरावतच्या विरोधात खटला भरण्यात आला होता. या प्रकरणात तिच्या विरोधात अजामिनपत्र गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली होती.

Leave a Comment