आधीपासूनच विवाहित आहे सलमानची नवी प्रेयसी

– अभिनेता सलमान खानबाबतची सध्याची सर्वात चर्चित खबर आहे त्याने शोधलेली नवी प्रेयसी. रोमन टीव्ही कलाकार लुलिया वेंचर हिच्यासोबत सलमानचे गेल्या काही दिवसांपासून सूत जुळले असून तो लवकरच तिच्यासोबत लग्नही करणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली आहे. सलमान सध्या आपला आगामी चित्रपट मेंटलच्या चित्रणानिमित्त हैदराबादमध्ये असून तिथे त्याच्यासोबत लुलिया दिसत आहे. त्यांचे प्रेमप्रकरण सध्या जोरात सुरू असले तरी त्याला आता एक नवे वळण मिळाले आहे.

लुलिया आधीपासूनच विवाहित असून सलमानची व तिची भेट झाल्यानंतर काही दिवसांतच त्यालाही याबाबत कळले होते. सलमान या रोमन अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याचे समजल्यापासून लुलिया इंटरनेटवर जरा जास्त सर्च केली जाऊ लागली आहे. लोक लुलियाबाबत जास्त जाणून घेण्यास इच्छुक आहेत. या उत्सुकतेतूनच सलमानची ही नवी प्रेयसी विवाहित असल्याची गोष्ट चव्हाट्यावर आली आहे. ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला संगीतकार मॉरियस मोगा
याच्यासोबत लुलिया डेटिंग करीत होती व त्यास फार जास्त दिवस लोटलेले नाही. मोगाही रोमन असून हे दोघे अनेक वेळा एकमेकांसोबत रोलर कोस्टर राईडवरही जात होते. त्यावेळी त्यांनी तिथे केलेली धमालमस्ती नेहमीच वृत्तपत्रांची हेडलाईन ठरत असायची. मॉरियस संगीतकारासोबत एक निर्माता आणि गायकही आहे. पॉप आणि क्लब म्युझिकसाठी मॉरियस बराच ओळखला जातो. लुलियाने त्याच्यासोबत एका प्रसिद्ध रोमन शो डान्सेस पेंट्र टाइनमध्ये सूत्रसंचालन केले होते तेव्हापासून ते दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. एकीकडे मॉरियस आणि लुलियाच्या नात्यांबाबत बरेच काही बोलले जाते तर दुसरीकडे एका फेसबुक पेजवरही ते दोघे विवाहित असल्याचे दाखविण्यात आले आहे. हे पेज ७ ऑगस्ट २0१२ रोजी अपडेट करण्यात आले होते. अर्थात दोन्ही सिलेब्रिटींनी या मुद्यावर मौनच ठेवले आहे. आता या दोघांत काय सुरू आहे, हे त्यांनाच माहीत, पण सलमानशी नाव जोडले जात असल्याचा लुलियाला नक्कीच फायदा होईल.

Leave a Comment