धनुष- सोनमच्या रांझणावर पाकिस्तानात बंदी

इस्लामाबाद दि. ५- केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय ठरलेल्या धनुष आणि सोनम कपूर यांच्या रांझणा या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. जूनच्या अखेरीच हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित केला जाणार होता. आयएमजीसी ग्लोबल एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व चित्रपटाचे आयातदार अमजद रशीद यांनी ही माहिती दिली आहे.

रशीद यांना पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने पत्र लिहिले असून रांझणा चित्रपटात विकृत चित्रण असल्याने तो येथे प्रदर्शित करता येणार नाही असे कळविले आहे. रांझणा मध्ये मुस्लीम युवती हिंदू मुलाच्या प्रेमात पडल्याचे दाखविले गेले आहे आणि हे इस्लामविरोधी आहे असे सेन्सॉर मंडळाचे म्हणणे आहे. यापूर्वी एक था टायगर आणि एजंट विनोद या चित्रपटातही पाकिस्तान विरोधी भावना असल्याचे कारण देऊन त्यांच्यावरही बंदी घातली गेली होती.

रांझणा चित्रपटातील टायटल ट्रॅक पाकिस्तानी गायक शिराझ उप्पल यानेच गायला असून चित्रपटाला अे.आर. रहमान यांचे संगीत आहे.

Leave a Comment