रणवीरचे नृत्य व सोनाक्षी बनली गायिका

सोनी चॅनेलवर प्रसारित होणार्‍या इंडियन आयडॉल ज्युनियरच्या सेटवर सह-कलाकार सोनाक्षी सिन्हा बरोबर आपला आगामी चित्रपट लुटेराच्या प्रमोशनकरिता आलेला रणवीर सिंग मजेच्या मूडमध्ये दिसत होता. दर्शकांच्या मनोरंजनाकरिता त्याने शाहरुख खान व सलमान खानच्या स्टाईलमध्ये डान्स केला. नेहमी खोडकर मूडमध्ये राहणार्‍या रणवीरने शोमध्ये सोनाक्षीची मस्करी केली, उमेदवारांबरोबर खूप मजा केली आणि गायनाचा देखील प्रयत्न केला.

अहमदाबादच्या निर्वेशने ज्यावेळी दिल से मधील गीत ए अजनबी गायले, तेव्हा रणवीर त्याच्या गायनाने प्रभावित होऊन त्याला शुभेच्छा देण्याकरिता तो व्यासपीठावर पोहोचला. रणवीरने सांगितले की, त्याला दिल से चित्रपटातील छैंया छैंया गीत देखील खूप आवडते. शाहरुखचा मोठा चाहता असलेल्या रणवीरने त्याच्या दोन्ही बाहू खोलण्याच्या लोकप्रिय पोस्टरची नक्कल केली आणि त्याच्या गाण्यांवर नृत्यदेखील केले. एवढेच नाही तर, रणवीरने संकल्प व होस्ट करण वाही यांच्याबरोबर सलमान खानचे गीत ओ ओ जाने जाना वर नृत्य केले. खरेच, याला लुटेरा परफॉर्मन्स बोलता येईल!

Leave a Comment