कोकणात बुधवारीही मुसळधार

रत्नागिरी, दि.३ – कोकणात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नद्यांना पूर आलाय. कुडाळजवळ पिठढवळ नदीच्या पुलावर पाणी आल्यामुळे, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. तुरळ गावाजवळही मुंबई – गोवा महामार्ग बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. कोकणात सोमवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवारीही विश्रांती घेतली नाही. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सर्वात जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या तरुळजवळ नदीपात्राजवळच्या घरात पाणी घुसल्याने, लोक घराच्या छतावर अडकले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाल्याने चिपळूण आणि संगमेश्वरच्या दिशेने काही किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील काफे, कळंबशी, नरडुवे, शिरबे, असावे या गावांचा माखजन मार्गे संपर्क तुटला आहे. तर राजापूर, लांजा, रत्नागिरी,
संगमेश्वर, चिपळूण आणि दापोलीत जोरदार पाऊस आहे. चिपळून आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान अरवली स्थानकानजीक रेल्वेच्या ट्रकवर माती आली
आहे. यामुळे कोकण रेल्वेला ही पावसामुळे ब्रेक लागल्याचं बुधवारी सायंकाळी सांगण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने थैमान घातलं आहे.

Leave a Comment