घाटकोपरमध्ये पकडले 95 लाखाचे 79 किलो चरस

मुंबई, दि.3 – घाटकोपरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून आज (बुधवार) 95 लाख रुपयाचे 79 किलो चरस जप्त केले. याप्रकरणी तीन जणांसह एक टाटा नानो गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अमली पदार्थ विरोधी विभागाला माहिती मिळाली होती, की फिरोज आणि शब्बीर सुम्भानिया हे पवईतील महाकाली मंदिरासमोर इस्माईल डोला याला हे अमली पदार्थ विकण्यास येणार आहे. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने सापाळा रचून यांना पकडले असून त्यांच्या कडून 79 किलो चरस जप्त केला. या सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर हजार करणाण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे का याचा हे पथक तपास करीत आहे.- सोबत संग्रहित चित्र

Leave a Comment