मुंबईच्या एक्स्चेंज इमारतीची आग नियंत्रणात

मुंबई, दि.3 – दक्षिण मुंबईतील बलार्ड पीअर परिसरातील एक्स्चेंज’ या तीन मजली शासकीय इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आज (बुधवार) सकाळी 11 च्या
सुमारास भीषण आग लागली. आग लागल्यानंतर या संपूर्ण इमारतीतील नागरिकांना खाली करण्यात आले. अग्निशमन दलाच्या 12 तर 7 पाण्याच्या टँकरने सलग 1.30 तासांच्या प्रयत्नांनंतर आगेवर ताबा मिळवला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलार्ड परिसरातील एक्सचेंज’ या तीन मजली शासकीय इमारतीतील तीसर्‍या मजल्यावर आग लागली. या इमारतीमध्ये 12 सरकारी
कार्यालये आहेत. यातील तिसर्‍या मजल्यावर सकाळी अकराच्या सुमारास भयानक आग लागली. त्यानंतर ती पसरत गेल्याने कार्यालयातील कागदपत्रे जळून खाक
झाली. या घटनेनंतर जवळच असलेल्या हिंदुस्तान पेट्रोल पंपाचे काम थांबवण्यात आले. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या इमारतीमध्ये जनगणना,
नार्कोटिक्स आदी विभागांची कार्यालये आहेत. या इमारतीमध्ये कोणीही अडकल्याची माहिती अजून समोर आलेली नाही. अग्निशामन दलाच्या 12 गाड्या
घटनास्थळी तसेच 7 पाण्याच्या टँकरने अखंड परिश्रम घेऊन ही आग नियंत्रणाखाली आणली आहे.

Leave a Comment