
सध्या सर्वत्र बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचत असलेला आपला चित्रपट ‘रांझणा’ला मिळत असलेल्या यशामुळे अभिनेत्री सोनम कपूर प्रचंड खूश आहे. ‘रांझणा’नंतर आता ‘भाग मिल्खा भाग’ या आपल्या आगामी चित्रपटाकडूनही तिला मोठय़ा अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सोनमने अवघे ११ रुपये मानधन घेतले आहे. एका महान खेळाडूच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट नक्कीच चित्रपटांच्या इतिहासाचा हिस्सा बनेल, असा सोनमला विश्वास असून अशा चित्रपटांसाठी पैसा महत्त्वाचा नसो, असे ती सांगते. ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपट प्रसिद्ध भारतीय अँथलिट मिल्खा सिंहच्या जीवनावर आधारलेला असून फरहान अख्तरने त्यात मिल्खाची प्रमुख भूमिका साकारली आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा प्रसून जोशी यांनी लिहिली आहे. येत्या १२ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. सोनम हल्लीच प्रदर्शित झालेल्या आपल्या ‘रांझणा’ चित्रपटाच्या यशाने अतिशय आनंदली आहे.
