
“बँड बाजा बारात” फेम रणवीर सिंग लवकरच झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी हा कौटुंबिक
चित्रपट असल्याचे समजते. कुटुंब म्हंटल की यात आई-वडिलांसह भाऊ – बहिण सगळेच आले. आता या चित्रपटात रणवीरच्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी
दिग्दर्शक अभिनेत्रीच्या शोधात आहे. “देसी गर्ल” प्रियांका चोप्रा आणि “यमी मम्मी” काजोल या दोघींची नावे या भूमिकेसाठी चर्चेत आहेत.
