‘हेडलाईन’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

मस्ती एन्टरटेंन्मेंट निर्मित असलेला आगामी चित्रपट ‘हेडलाईन’चा मुहूर्त नुकताच झाला. मराठी चित्रपटात नाविन्या बरोबर चांगल्या विषयाची निवड केली जात आहे. मराठी चित्रपट हा आशयघन असून त्याची हाताळणी योग्य रित्या केल्याने मराठी चित्रपट जगभर ओळखला जातोय. ‘हेडलाईन’ या चित्रपटाची कथा आताच्या गतिमान युगातील इंटरनेट वरील माध्यमांनावर बेतली आहे. या माध्यमांचे फायदे – तोटे यात मांडण्यात आले असून मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रबोधन या सिनेमातून करण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुनील वाईकर यांनी सांभाळली आहे. वाईकर यांनी याच्या अगोदर अनेक विडीओ अल्बमचे दिग्दर्शन केले असून नुकताच त्यांनी ‘डोंबारी’ चित्रपट केला आहे. या चित्रपटातून निखिल वैरागर व अजिंक्य जाधव हे कलाकार या चित्रपटातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत रसिकप्रेषकांच्या भेटीस येत आहेत. त्याच्या बरोबर प्रसाद ओक, सिया पाटील, पूजा पवार, वंदना वाकनीस, दिपक करंदीकर, शास्वती पिंपळनेकर, रवी महाजन असे अनेक मराठीतले नावाजलेले कलाकार आपणास या चित्रपट दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा – पटकथा सुनील वाईकर, संवाद – प्रदीप रघुनाथ, संगीत – प्रसाद अदुवत, तर छायाचित्रण चारुदत्त दुखंडे यांचे आहे.

Leave a Comment