नरेंद्र मोदींसाठी पुण्यातूनही नमो आर्मी

पुणे दि.२८ – भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार प्रमुख पदी निवड झालेले गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याच्या पुण्यातील समर्थकांनी त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी आर्मी किवा नमो आर्मी या नावाने सपोर्ट ग्रुप स्थापन केला आहे. हा गट संपूर्ण राज्यभर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींसाठी पाठिबा मिळविण्याचे काम करणार आहे.

या ग्रुपचे महासचिव बी.बी. सोमाणी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की ही राष्ट*ीय कल्पना आहे आणि आत्तापर्यंतच महाराष्ट्रात मोदींसाठी २ लाख समर्थक काम करत आहेत. आम्ही आगामी लोकसभेसाठी भाजपचा प्रचार करणार आहोत आणि तेही मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून करणार आहोत. देशात माजलेल्या भ्रष्टाचारातून देशाची सुटका करण्यासाठी मोदी हीच एकमेव आशा आता जनतेला वाटते आहे. केवळ पुण्यातच नव्हे तर याच धर्तीवर मुंबई, अहमदनगर, नागपूर, अकोला, सातारा अशा राज्यातील मोठ्या शहरातूनही नमो आर्मी मोदींना समर्थन मिळविण्यासाठी प्रचार करणार आहे.

दरम्यान येत्या १४ जुलैला नरेंद्र मोदी पुण्यातील साधू वास्वानी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या उद्घाटनासाठी येत आहेत आणि यावेळी ते वास्वानी मिशनचे दादा वास्वानी यांची भेट घेणार आहेत असे समजते.

Leave a Comment