कलमाडी एशियन अॅथलॅटिक असो. निवडणूक लढणार

पुणे दि.२८ – एशियन अॅथलेटिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास सुरेश कलमाडी सज्ज झाले असून त्यांचा प्रचारही सुरू झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. १ जुलै रोजी होत असलेली ही निवडणूक जिंकल्यास कलमाडी सलग तिसर्‍यांदा या असोशिएशनचे अध्यक्षपद भूषवतील. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात येत्या १३ जुलैपासून या स्पर्धा होत आहेत.

सुरेश कलमाडी यांच्या विरोधात असोएशनचे वरीष्ठ उपाध्यक्ष कतारचे ब्रिगेडियर दहलन जुम्मान अल हमद हे निवडणूक रिंगणात आहेत. पुण्यातील असोसिएशनचे एक अधिकारी या बद्दल मत व्यक्त करताना म्हणाले की दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स प्रकरणात कलमाडी यांची प्रतिमा डागाळली गेली आहे. ते ही निवडणूक लढविण्यास का उत्सुक आहेत हे सांगता येत नसले तरी या निवडणूकीत हम्मद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. हम्मद इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक फेडरेशनचेही उपाध्यक्ष आहेत.

सुरेश कलमाडी दीर्घकाळ म्हणजे २००० सालापासून एशियन अॅथलेटिक असो.च्या अध्यक्षपदी आहेत. पहिली निवडणूक त्यांनी जकार्तात मोहमद हसन यांच्याविरोधात जिंकली होती तर दुसर्यां दा ते २००९ साली चीनमध्ये झालेल्या निवडणूकीत विजयी झाले होते.

Leave a Comment