उत्तराखंडमध्ये पायलट डॅरिल कॅस्टिलीनोंना वीरमरण

मुंबई : उत्तराखंडमध्ये प्रलय आल्यानंतर यात्रेकरूना बाहेर सुखरूप काढण्यासाठी मदत करणा-या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या दुर्घटनेत वीरमरण आलेल्यांमध्ये, मुंबईच्या डॅरिल कॅस्टिलीनो यांचाही समावेश आहे. कॅस्टिलीनो या हेलिकॉप्टरचे पायलट होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे कुटुंबिय कलकत्याला रवाना झाले आहे. दरम्यान याठिकाणी मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी येत असल्याचे समजते.

वीरमरण आलेल्या वीस पैकी अठरा जणांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कॅस्टिलिनो यांच्यावर नेमके कधी अंत्यसंस्कार होणार, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

कॅस्टिलिनो वायुसेनेत विंग कमांडर म्हणून कार्यरत होते. अपघात घडला त्यावेळेस ते पश्चिम बंगालमधल्या बराकपूरमध्ये त्यांची पोस्टींग होती. उत्तराखंडमधे हाहाकार झाल्यानंतर जी हेलिकॉप्टर पहिल्या टप्प्यात लोकांना वाचवण्यासाठी केदारनाथमध्ये दाखल झाले होते, त्यात डॅरिल कॅस्टिलिनो यांच्या चॉपरचा समावेश होता. त्यांधनी या संकटातून अनेक जणांचे प्राण वाचवले. मात्र त्याचचाच हेलिकापटरला अपघात झाला.