आदित्य पांचोलीवर गुन्हा, अटकेची शक्यता

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणीत दिवसेदिवस भर पडत आहे. आदित्य पांचोलीने शेजारी राहत असलेल्या नागरिकाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून आदित्य पांचोली विरुदध् गुन्हा दाखल करण्यारत आला आहे. याप्रकरणी भार्गव पटेल यांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य पांचोलीला अटक होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणातील आरोपी सुरज पांचोलीचा जामीन अर्ज, आज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सुरज हा आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. सुरजवर जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला २० जूनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीसाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यांनतर आता अभिनेता आदित्य पांचोलीनेच घरा जवळील शेजा-यांना मारहाण केल्याकची फिर्याद भार्गव पटेल यांनी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यारनुसार वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीला अटक होण्याची शक्यता असल्याची मासहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Leave a Comment