एटीएम डेटा चोराची ओळख पटली

मुंबई, दि.27 – कुलाबा येथील महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाबाहेरील एक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरमधून एटीएमचा डिजिटल डाटा स्क्रिमर उपकरणाने लाखो रुपये लंपास करणार्‍या आरोपींची ओळख पोलिसांना पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले दोन्ही आरोपी बल्गेरीयन असून त्यांच्या अटकेसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एवानोव्ह (वय – 27 वर्षे) आणि तेस्नेव ( वय – 28 वर्षे) अशी या बल्गेरीयन आरोपींची नावे आहेत. 4 एप्रिल रोजी हे दोघेजण मुंबईत आले होते. एक्सीस बँकेच्या कुलाबा येथील एटीएम सेंटरमध्ये स्किमर उपकरण बसविले होते. त्यानंतर ते 19 एप्रिलला आपल्या देशात परत गेले. या उपकरणाच्या माध्यमातून एटीएम सेंटरमध्ये येणार्‍या ग्राहकांच्या डेबीट कार्डाचा डेटा त्यांनी चोरला होता. या डेटाच्या आधारे बनावट डेबीट कार्ड बनवून त्यांनी ग्रीस मधून लाखो रुपये काढले होते.
दक्षिण मुंबईतील एक्सीस बँक, व्यतिरिक्त इंडस बँकेच्या चार एटीएम सेंटर आणि कॉर्पॉरेशन बँकेच्या एका एटीएम सेंटर मधून देखिल डेबिट कार्डची डिजिटल डाटा चोरण्यात आली असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

अधिक तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दोन तरुण स्किमर उपकरण लावताना आढळले होते. त्याआधारे पोलिसांनी त्यांची छायाचित्रे बनवून त्यांचा शोध सुरू केला होता. हे दोन्ही तरुण बल्गेरिया देशाचे नागरीक असून त्यांची गुन्हेगारी पाश्वभूमी आहे. तीन महिन्यांच्या व्हिजावर ते
मुंबईत आले होत़े परंतु 20 दिवसांतच काम आटोपून ते भारताबाहेर गेले होते. त्यांना भारतात आणून अटक करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती दक्षिण मुंबई अतिरिक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

Leave a Comment