मुंबईजवळ समुद्रात जहाज बुडाले

मुंबई, दि.26 – मुंबईजवळील समुद्रात सिंगापूरच्या कंपनीचं मॉन कम्फर्ट’
नावाचं जहाज बुडालं आहे. हे जहाज 21 तारखेला खवळलेल्या समुद्रात सापडलं
होतं. ते आज बुडाल्याचं कोस्ट गार्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
जहाजावरील 20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हे जहाज सिंगापूरहुन 4 हजार
कंटेनर घेऊन नॉदर्न युरोपला निघालं होतं. मात्र मुंबईजवळ आल्यावर खोल
समुद्रात त्याचे दोन तुकडे झाले. या जहाजावरील कंटेनर गोवा आणि
महाराष्ट्राच्या किनार्‍यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र
किनारी कोस्ट गार्ड आणि नेव्हल पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a Comment