तुर्भे येथील पीडित मुलीचा मृत्यू

नवी मुंबई – तुर्भे येथील झोपडपट्टी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या एका १० वर्षीय मुलीला डोंगरातील एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. केवळ १० रुपयांचे आमीष दाखवून चार किशोरवयीन मुलांनी तुर्भे येथे १० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. या घ्‍टनेनंतर तुर्भे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील चारही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तुर्भे येथील झोपडपट्टी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या एका १० वर्षीय मुलीला डोंगरातील एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. मात्र या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला नेरुळ येथील रुग्णालयात हलवले होते. दरम्यान, पीडित मुलीच्या मैत्रिणीने परिसरातील चार मुलांनी तिच्यावर बलात्कार केला असल्या चे सांगितले. या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

पीडित मुलीच्या मैत्रिणीने सांगितल्यानंतर या प्रकरणातील चारही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चार जणांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Leave a Comment