जालन्यात 1 कोटी 23 लाखांचा गुटखा जप्त

जालना, दि.26 – जालन्याच्या औद्योगिक परिसरात आज (बुधवार) अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1 कोटी 23 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून, या ठिकाणाहून गुटखा बनविण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

जालन्याच्या एमआयडीसी परिसरात एका गोदामामध्ये हा गुटखा लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून हा सर्व माल हस्तगत केला. हस्तगत करण्यात आलेल्या मालात केतन’ कंपनीच्या गुटख्याचे 33 लाख रुपये किंमतीची 150 पोती, तसेच 80 लाख रुपये किंमतीची तंबाखूची 1 हजार पोती जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच गुटखा बनविण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.