सोनाक्षीने घेतला मॉलचा धसका

दबंगगर्ल सोनाक्षी सिन्हा आजकाल मॉलपासून चार हात लांबच राहणे पसंत करत आहे. तिला मॉलमध्ये शॉपिंगची मुभा नाही वा तिच्याकडे त्यासाठी वेळ नाही म्हणून ती मॉलपासून दूर पळते आहे, असे नाही तर यामागचे कारण आहे तिचे चाहते. तिने आपल्या निर्मात्यांनाही मॉलमध्ये होणार्‍या चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनला आपण हजर राहणार नसल्याचे आधीच बजावून ठेवले आहे.

प्रेक्षकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी अनेक निर्माते मॉलमध्ये त्याच्या प्रमोशनसाठी जातात. ही कल्पना भलेही चांगली असली तरी सोनाक्षी लुटेरा आणि वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई अगेन या आपल्या आगामी चित्रपटांसाठी कोणत्याच मॉलमध्ये जाणार नाही. गेल्यावर्षी घडलेल्या एका घटनेनंतर तिने हा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी सांगते की, हल्ली सर्वत्र फोफावलेले मॉल कल्चर मलाही पसंत आहे, पण बर्‍याचदा तिथली गर्दी एवढी उतावीळ व बेभान होते की, सुरक्षारक्षकसुद्धा काहीच करू शकत नाहीत. गेल्यावर्षी एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिला आलेला एक अनुभव अतिशय वाईट होता. त्यामुळेच पुन्हा त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तिची अजिबात इच्छा नाही. त्या घटनेबाबत सोनाक्षीने आजवर कुणालाच सांगितलेले नव्हते, पण तिच्या जवळच्या
मैत्रिणीकडून असे समजले की, गेल्यावर्षी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी गर्दीतील एका तरुणाने तिला स्पर्श करण्याचा प्रय▪केला होता. धक्काबुक्की करीत तो तिच्या चांगलाच अंगलटीला आला होता. तेव्हापासून ती अशा ठिकाणी जाणे टाळते. यामुळेच काही दिवसांपूर्वी आपल्या चित्रपटाच्या
प्रसिद्धीसाठी सोनाक्षीने दुबईतही मॉलमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. शेवटी एका रेस्टॉरंटमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करावे लागले होते.

Leave a Comment