रोहित रॉय ला ‘जेडीजे’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री

टी.व्ही.वरील सुप्रसिध्द कलाकार रोहित रॉय याला सेलिब्रेटी डान्स रिएलिटी शो ‘झलक दिखला जा’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. ‘झलक दिखला जा’च्या मागील दोन सिझनमध्ये त्याचा भाऊ रोनित रॉय हा स्पर्धक होता. आता त्याच्या पावलावर पाऊल टाकत रोहितही आपल्या डान्सचा जलवा ‘झलक दिखला जा’ मध्ये दाखवणार हे नक्की.

आपला भाऊ ‘झलक दिखला जा’मध्ये परफॉर्म करणार आहे, यामुळे उत्साहीत असलेल्या रोनितने मायक्रोब्लॉगींग साईट ट्वीटरवरील आपल्या अकाऊंटवर याबद्दलची उत्सूकता ट्वीट करुन व्यक्त केली आहे. त्याने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने, ‘मित्र आणि मैत्रिणींनो, माझा रॉकस्टार भाऊ रोहीत ‘झलक दिखला जा’मध्ये येणार असून त्याचे इथे स्वागत आहे.’ असे लिहिले आहे. रोहितच्या या ‘झलक दिखला जा’च्या परफॉर्मन्सला त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबियांनीही भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment