पुणे, दि. 25 (प्रतिनिधी) -आजपर्यंत अशक्य समजल्या जाणार्या पाठीच कुबडावरील महागड्या शस्त्रक्रियेवर ससून रुग्णालयात गरिबासाठी विनामूल्य उपचार शक्य झाला आहे. ससून रुग्णालयात एका मुलीवर कायफो-स्कोलिऑसीस (कुबडाची) या पाठीच्या कण्याच्या आजारावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे संबंधित मुलीला सर्वसामान्यांप्रमाणे चालता फिरता येणार आहे. ससूनमध्ये राजीव गांधी योजनेअंतर्गत ही शस्त्रकि‘या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती शल्यचिकित्सक अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. शस्त्रक्रियेबाबत सांगताना डॉ. चंदनवाले म्हणाले की, पाठीच्या मणक्यातील स्नायू व मज्जारज्जू यांच्यामध्ये संतुलन नसल्यास किंवा जन्मजात मणक्याची वाढ होत नसल्यास हा आजार होऊ शकतो. काही वेळेला कोणताही दोष नसतानाही कुबड येते. या आजाराची कारणे मुख्यतः स्नायूंशी निगडित असू शकतात.
मुलांपेक्षा मुलींमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळून येते. या आजारामुळे रुग्णाची फुफुसांची ताकद, पायातील ताकद कमी होते आणि कुरुपता वाढते. ससूनमधील मणक्यांचे शल्यचिकित्सक अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. विशाल पाटील, डॉ. राहुल पुराणिक, डॉ. कुणाल बन्सल, डॉ. अंकीत पोखर्णा, परिचारिका राधा खान यांनी मिळून ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत सुमारे 55 अंशांचा बाक सरळ करण्यात डॉक्टरांना यश मिळाले. ससूनमधील भूलतज्ज्ञ डॉ. माया जामकर व त्यांच्या टीमने भुलीची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली.
कायफो-स्कोलिऑसीस म्हणजेच कुबड बालपणी अथवा पौगंडावस्थेत ही समस्या उद्भवू शकते. पौगंडावस्थेत बर्याचशा रुग्णांचा हा बाक तुलनेने कमी असतो. पण हा बाक 40 ते 50 अंशापेक्षा जास्त असल्यास शस्त्रक्रिया करणे भाग पडते. कुबडाची ही गुंतागुंतीची शस्त्रकि‘या आहे. त्यात टायटॅनिअम हे स्क्रू बसवून कण्याचा बाक कमी केला जातो. शस्त्रक्रियेदरम्यान मज्जारज्जूस कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, असे सांगताना डॉ चंदनवाले म्हणाले, ससूनमध्ये कायफो-स्कोलिऑसीस (कुबडाची) शस्त्रक्रिया करण्यासाठी निष्णात डॉ्क्टरांची टीम उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेसाठी येणारा भरमसाठ खर्च पाहता अनेक रुग्ण उपचार घेत नाहीत. तथापि शासकीय रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येते,