पहिल्या फेरीत नदालचा धक्कादायक पराभव

लंडन: विम्बल्डन स्पहर्धच्या सलामीच्या सामन्यात लाल मातीचा बादशाह राफेल नदालला बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसकडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. लाल मातीचा बादशाह नदाल हिरवळीवर मात्र मातीमोल ठरला.विम्बल्डनच्या सलामीच्या सामन्यात नदालला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. बेल्जियमच्या स्टीव्ह डार्सिसने नदालला ७-६, ७-६, ६-४ असं सरळ सेट्समध्ये पराभूत केले. नदालने १५ दिवसांपूर्वीच फ्रेन्च ओपनचे विक्रमी आठवे जेतेपद मिळवले होते.

जागतिक क्रमवारीत १३५व्या स्थानावर असलेल्या डार्सिस उर्फ शार्ककडून नदादला पराभव पत्करावा लागला. कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद होण्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे. मागील वर्षी पण त्याला दुस-या फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.

एटीपी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानवर असलेल्या नदालने पहिल्या दोन सेट्समध्ये चांगला संघर्ष केला आणि दोन्ही सेट्स टायब्रेकर्सपर्यंत गेले. पण नदाल दोन्ही सेट्समध्ये टायब्रेकरला हरला.
तिस-या सेट्समध्ये पुन्हा परतण्याची त्याचे प्रयत्न फारसे उपयोगी पडले नाहीत आणि नदालने हा सामना ७-६, ७-६, ६-४ असा गमावला.

Leave a Comment