रविंद्र जडेजा क्रमवारीत तिस-या स्थानी

नवी दिलली- आयसीसी चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर टीम इंडियाने क्रमवारीतले अव्वमल स्थादन टिकवले आहे. चॅम्पियन्स मालिका जिंकल्यामुळे टीम इंडियाच्याग क्रमवारीला आणखी मजबूत झाली आहे. त्याच सोबतच गेल्या् काही सामन्यावत चमकदार कामगिरी करणा-या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आयसीसीच्या गोलंदाज व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिसरे स्थान गाठले आहे. जडेजाने या स्पगर्धेत उल्लेेख्नीय कामगिरी केली आहे: त्या सोबतच शिखर धवनने दमदार कामगिरी केली.

सध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार टीम इंडियाच्या क्रमवारीत १२३ गुणांसह अव्वल स्थान कायम आहे. चॅम्पियन्स मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा रविंद्र जडेजानेही त्याच्या क्रिकेट करिअरमधील अव्वल स्थान गाठले आहे. सध्याव तो अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तिस-या स्थानी आहे.

जडेजाने या चॅम्पियन्स करंडक मालिकेत १२ विकेट्स घेऊन मालिकेचा ‘गोल्डन बॉल’ चषकाचा मानकरी ठरला. त्याचबरोबर मालिकेच्या अंतिम सामन्यात २४ चेंडूत नाबाद ३३ धावा जडेजाने ठोकल्या होत्या. अंतिम सामन्यात केलेल्या२ दमदार कामगिरीमुळेच टीम इंडियाला हा सामना पाच धावांनी जिंकता आला.

Leave a Comment