गोपीनाथ मुंडे यांना पुतण्याचा दणका

बीड – बीड जिल्ह़यातील शिरसाळा पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बाबासाहेब काळे निवडून आले आहेत. या निवडणूकीत भाजपचे नेते तथा खासदार गोपीनाथ मुंडे यांना त्यांचा पुतण्या धनंजय मुंडेने धक्का व दिला आहे. या निवडणूकीकडे संपूर्ण बीड जिल्ह़ायाचे लक्ष्‍ा लागले होते.

वर्षभरापुर्वी धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडल्याने परळी नगरपलिकेतील सत्ता गोपीनाथ मुंडे यांना गमवावी लागली होती. तर जिल्हा परिषद निवडणूकीत गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या वडिलाचा पराभव केला होता. त्यामुळे बरोबरी झाली होती.

शिरसाळा पंचायत समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून गोपीनाथ मुंडे गटाचे वर्चस्व आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुध्द धनंजय मुंडे असे चित्र होते. यात धनंजय मुंडे यांचे डावपेच यशस्वी ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब काळे यांना पंचायत समितीवर निवडून आणले. या पराभवामुळे गोपीनाथ मुंडे यांना धक्का बसला आहे.