सायना नेहवालने केली पुन्हा एकदा निराशा

सिंगापूर – सिंगापूर येथे खेळल्या जात असल्याबद्दल ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने पुन्हा एकदा आपल्या तमाम चाहत्यांची निराशा केली. तिला इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनेत्रीने पराभूत केले. गेल्या काही दिवसापासून सायनाला चार मोठ्या स्पर्धेत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनेत्रीने सायनाचा १७-२१, २१-१३ , २१ -१३ अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने सायनाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच विजयासह इंडोनेशियाच्या खेळाडूने उपांत्य फेरीत धडक मारली.

भारताच्या सायना नेहवालने पहिल्या गेममध्ये दमदार सुरुवात करून बाजी मारली. तिने तीन गुणांची कमाई करून १७-१३ ने आघाडी मिळवली. त्यानंतर ही लय अबाधित ठेवत तिने पहिला गेम २१-१७ ने जिंकला. त्यानंतर दुस-या गेममध्ये फेनेत्रीने दमदार पुनरागमन केले. तिने सुरेख स्मॅश मारून आघाडी मिळवली. तिने सायनाला पिछाडीवर टाकून दुसरा सेट आपल्या नावे केला. इंडोनेशियाच्या खेळाडूने तिस-या सेटमध्येही दबदबा कायम ठेवला.

Leave a Comment