आदित्य व श्रद्धाच्या मैत्रीत आली परिणीता

– ‘आशिकी-२’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी शक्ती कपूरची कन्या श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील गडद मैत्रीला कुणाची तरी नजर लागली आहे. आदित्य आणि श्रद्धा यांच्यात आता बराच दुरावा आल्याचे कानावर येत आहे आणि या सगळ्य़ासाठी कारणीभूत ठरली आहे परिणीता चोप्रा. काही दिवसांपूर्वीच आदित्यने परिणीतासोबत आदित्य चोप्राच्या बॅनरखाली तयार होत असलेला चित्रपट स्वीकारला. खरेतर या चित्रपटासाठी श्रद्धा इच्छुक होती व तिने त्यासाठी जीव तोडून प्रयत्नही सुरू केले होते, पण तिची डाळ काही शिजली नाही आणि तिच्याऐवजी परिणीताची वर्णी लागली. सप्टेंबरपासून चित्रीकरण सुरू होत असलेल्या या चित्रपटात श्रद्धाला आदित्यची नायिका म्हणून काम करण्याची इच्छा होती.

ही भूमिका आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तिने जोरदार फिल्डिंग लावली होती. आदित्यची या चित्रपटासाठी आधीच निवड झालेली असल्याने त्याने आपल्याही नावाची शिफारस करावी असा आग्रह तिने त्याच्याकडे धरला होता. मात्र आदित्यने श्रद्धाची कोणतीही शिफारस निर्मात्यांपर्यंत पोहोचविली नाही. आदित्यला शक्य असूनही त्याने आपल्यासाठी प्रय▪न केल्याची ही गोष्ट श्रद्धाला चांगलीच खुपली. आदित्यने आपल्याला फसविले असे तिला वाटत आहे. त्यामुळे ती त्याच्यावर अतिशय नाराज आहे. श्रद्धाला दूर लोटत परिणीताने फक्त चित्रपटात शिरकाव केला आहे, असे नाही तर ती आदित्य व श्रद्धा यांच्या मैत्रीमध्येही आली आहे. आजकाल या दोघांमध्ये चांगलीच गट्टी जमली असल्याचे सूत्रांकडून कळते. श्रद्धाला विसरून आदित्य हल्ली परिणीतासोबत हिंडताफिरताना दिसतो. त्यालाही तिची ही साथसंगत भलतीच पसंत असल्याचे जाणवू लागले आहे. आता सिनेवतरुळात आदित्य व परिणीताच्या मैत्रीला काय नाव दिले जाते, हे येणारा काळच सांगेल, पण एक मात्र नक्की की, यामुळे श्रद्धाची समस्या जरूर वाढू शकते.

Leave a Comment