‘अवतार गिल’ मराठीत.

आयडियल एन्टरटेंन्मेंट प्रस्तुत व अविनाश मोहिते निर्मित आगामी ‘अंगारकी’ या चित्रपटात हिंदीतला गाजलेला चेहरा अवतार गिल हे या चित्रपटातून मराठीत पदार्पण करत आहेत. १९७९ साली ‘नुरी’ या हिंदी चित्रपटातून अभिनयाचा श्री गणेशा करणारे अवतार गिल यांनी हिंदी, पंजाबी, तमिळ अशा अनेक भाषिक चित्रपटात त्यांनी अभिनय करून रसिकप्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले आहे. दिलवाले, मेजरसाब, शेहनशहा, आशिकी १, मोहरा, बागबान, जोकर हे त्यांचे विशेष लक्षात राहणारे चित्रपट होय. जवळजवळ ३५० चित्रपटात काम केलेले अवतार गिल मुळचे पंजाबी आहेत. गिल हे पंजाबी म्हणून स्व:ताची ओळख करून न देता मी महाराष्ट्रीय आहे गर्व आहे मला महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा. मराठी अस्मितेच कारण मी वाढलो, शिकलो, नाव कमवले या मुंबईत या महाराष्ट्रात मी ऋणी आहे या मातीचा असे ते अस्खलित मराठी भाषेत बोलून सांगतात. मराठी भाषेवर प्रभूत्व आणि मराठी संस्कृतीची जाण असणारे अवतार गिल यांनी त्यांचा अभिनयाचा मोर्चा आता मराठीकडे ओळ्वला आहे.

गिल सांगतात की, शालेय व कॉलेजच्या काळात मी मराठी चित्रपट नाटक आवर्जून पाहायचो. माझे आवडते कलाकार डॉ. श्रीराम लागू, दादा कोंडके, निळू फुले हे असून लागुंचे नटसम्राट हे नाटक माझ्या अंतर मनाला भिडले त्यानंतर सामना, पिंजरा, सिंहासन अशा बऱ्याचश्या चित्रपटातील निळू फुले व लागूंचा अभिनय पाहून मी प्रेरीत झालो. दादा कोंडके यांच्या पांडू हावलदार, रामराम गंगाराम असे दादांचे अनेक चित्रपट माझ्या मनाला भिडून गेले. खूप दिवसापासून मनात माझ्या इच्छा होती मराठी चित्रपटात काम करायचे पण खूप कालावधी नंतर मला हि संधी ‘अंगारकी’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात मी मुस्लिम अब्बाची भूमिका साकारतोय. चित्रपटाची कथा खूपचं छान आहे. मला आवडली आणि मी चित्रपटात काम केले.

या चित्रपटात मकरंद अनासपुरे, तेजस्विनी पंडीत, गार्गी पटेल, शरद पोंक्षे, विलास उजवणे, अनिल नगरकर, संदीप गायकवाड, नयन जाधव असे मराठी व हिंदीतील कलाकार काम करीत आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत दुधगावकर यांनी सांभाळली असून चित्रपटाचे लेखन संजय पवार यांचे आहे. तर प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे हे आहेत छायाचित्रण गिरीश उदाळे, कला सतिश बीडकर यांची आहे. अविनाश मोहिते यांची हि पहिली निर्मिती आहे.

Leave a Comment