हुवाईचा नवा स्लीमेस्ट स्मार्टफोन

लंडन, दि.21 – सोनीने ज्या प्रमाणे वोटरप्रुफ आणि डस्टप्रुफ फोनची निर्मिती करून क्रांती केली त्याचप्रमाणे हुवाई या कंपनीनेही जगातला सर्वात स्लीमेस्ट स्मार्टफोन बनवून क्रांती घडवली आहे. लंडन येथे नुकतच या फोनच दमदार लाँचिंग झाले. चायनीज मोबाईल कंपनी हुवाईने जगातील स्लीमेस्ट स्मार्टफोन लाँच केला आहे.

अ‍ॅसेंड पी 6 असे या स्मार्टफोनच नाव असून याच्या एकदम क्लासिक लुकमुळे तो बघता क्षणीच मनाला भुरळ घालत आहे. हुवाई अ‍ॅसेंड पी 6 या स्मार्टफोनचे मुख्य फिचर हे कंपनीने सांगितल्याप्रमाणे या फोनची जाडी केवळ 6.18 मिमी आहे. हा स्मार्ट फोन आतापर्यंतचा जगातला
सर्वात बारीक स्मार्ट फोन असल्याचा दावा हुवाईने केला आहे. या फोनचे वजन अवघे 120 ग्रॅम्स इतके आहे. त्यामुळे हा फोन एकदम हँडी असेल यात शंका नाही. या स्मार्टफोनची जी स्क्रीन आहे ती 4.7 इंचाची कॅपॅसिटीव्ह टचस्क्रीन आहे. तसंच ही स्क्रीन फुल एचडी असून ती 720 बाय 1280 पिक्सेलची आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.5 गिगाहर्ट्सचा कोर्टेक्स ए9 प्रोसेसर असून 2 जीबी रॅम आहे. त्यामुळे या फोनमध्ये अतिशय हेवी फाइल्स देखील पटकन ओपन होतील. यात असलेले आणखीन एक महत्वाचे फिचर म्हणजे यातला फ्रंट कॅमेरा. यात 8 मेगा पिक्सेलचा रियर कॅमेरा तर आहेच, पण 5 मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. सध्या स्मार्टफोनचा वापर व्हिडीओ कॉलिंगसाठी जास्त होतो हे लक्षात घेऊनच हुवाईने यात फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा ठेवला आहे. यात असलेला रियर कॅमेराही एचडी रेकोर्डिंग करू शकतो. तसेच यात बीएसआय सेन्सर देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्वात लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

अँड्रोईड 4.2.2. अ‍ॅसेंड पी 6 मध्ये 8 जीबीचे इंटर्नल स्टोरेज आहे जे मायक्रो एसडी कार्डने वाढवता देखील येऊ शकते. यात 2000 एमएएचची बॅटरी आहे. या सर्व फीचर्स मध्ये अ‍ॅसेंड पी 6 ची बॅटरी थोडी कमी वाटते. जगातील सर्वात स्लीमेस्ट अश्या या फोनमध्ये ड्युअल सिमची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि पिंक रंगात उपलब्ध असेल. पण या फोनची
किंमत मात्र अद्याप सांगण्यात आलेली नाही. लवकरच हा फोन चीनमध्ये उपलब्ध होईल आणि नंतर हळूहळू तो इतर देशांमध्ये उपलब्ध होईल.