कैटरिना सोबत करणार सुशांत रोमान्स

काही दिवसापूर्वी सुशांत सिंग राजपूतने छोट्या पडदयाला राम राम करून बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली आहे. त्याचा ‘काय पो छे’ हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. त्यानंतर त्याने दमदार एन्ट्री केली असून सध्या सुशांतच्या हातात बरेच चांगले चित्रपट आहेत. आगमी काळात तो आमिर खानच्या ‘पीके’ या सिनेमात झळकणार आहे. त्यानंतर येत्या काळात एका सिनेमातून त्याला कैटरिना कैफबरोबर रोमान्स करण्याची संधी मिळणार आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूरने आतापर्यंत ‘रॉक ऑन’ व ‘काय पो छे’ सारखे हिट सिनेमे केले आहेत. एका सिनेमाच्या तयारीत सध्या अभिषेक कपूर बीजी आहे. त्याच्या या सिनेमात कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिषेकने कतरिनाशी या सिनेमाबद्दल बोलणी केली असून तिला सिनेमातीची स्क्रिप्ट आवडली आहे, असे समजते.

अभिषेक कपूरच्या या सिनेमातील भूमिकेसाठी सुशांत सिंगची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जर असे झाले तर सुशांत कतरिनाबरोबर स्क्रीन शेअर करताना आणि रोमान्स करताना दिसू शकेल. छोट्या पडदयावरील सुशांत सिंगने खूपच कमी दिवसात मोठी मजल मारली आहे. त्याला लवकरच आघडीच्या अभिनेत्री सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

Leave a Comment