इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू

ठाणे: ठाण्यातील मुंब्रा स्थानकाजवळ ‘स्मृती’ नावाची ३० ते ३५ वर्ष जुनी असलेली तीन मजली इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत २ महिन्यांच्या मुलीसह सात वर्षांच्या मुलाचा बळी गेला, तर १४ जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारस घडली. आणखी सात ते आठ जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. त्यामुळे मयताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारस सुरुवातीला बिल्डींगचा काही भाग कोसळल्याने काही या इमारतीमधील काही जन तात्काळ बाहेर पडले. त्यानंतर संपूर्ण इमारत कोसळली. ही इमारत ३० ते ३५ वर्ष जूनी असून ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतीची नोटीस दिली होती.

या बिल्डींगच्या तळमजल्यावर मालाचे गोदाम होते, तर वरच्या तीन मजल्यात काही कुटुंब वास्तव्यास होती. या दुर्घटनेत आठ जणाचा बळी गेला, तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराथ नजीकच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment