माझ्यासाठी सिनेमाचे सर्व काही – अक्षय कुमार

गेल्या काही दिवसापासून जीवनात जी काही इज्जत, दौलत, जीवनशैली मध्ये जो बदल झाला हे तो केवळ सिनेमामुळे झाला आहे. माझ्या २० वर्षाच्या करियरमध्ये जे काही लाभले ते सिनेमामुळे शक्य झाले. त्यामुळे माझ्यासाठी सिनेमाचे सर्व काही आहे असे मत बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार यांनी व्यक्त केले.

अक्षयने १९९१ मध्ये ‘सौगंध’ या सिनेमातून करियरची सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याला करियरमध्ये मागे फिरून पाहण्याची वेळ आली नाही. याबाबत अधिक बोलताना अक्षय म्हणाला, ‘ सिनेमा हाच माझ्यासाठी दाना-पानी आहे. यातूनच मी सुरुवात केली. त्यामुळे मी सिनेसृष्टीचा अभारी आहे. सिनेमा हाच माझ्यासाठी सर्व काही आहे. सिनेमात काम करीत असतान वितरक आणि प्रदर्शक खुश झाले तर त्याचा फायदा होतो. बॉक्सऑफिस वर त्याचे परिणाम चांगले दिसून येतात.’

सर्वात जास्त कमाई करना-या अभिनेत्यामध्ये अक्षयची तुलना केली जाते. गेल्या काही वर्षात त्याने ‘हाउसफुल-२’ आणि ‘राउडी राठौड’ सारखे सिनेमे दिले आहेत. या दोन्ही सिनेमातून बॉक्सऑफिसवर १०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Leave a Comment