मस्त, मनमौजी ‘मुकरे ’

‘मैत्री ’ या विषयावर आधारित चित्रपटांची बॉलिवुडमध्ये नेहमीच रेलचेल राहिली आहे. मैत्रीवर आधारित ‘मुकरे ’ हा चित्रपट दिग्दर्शक मृणदिपसिंग लांबाने आता आपल्या भेटीसाठी आणला आहे. नव्या युगातील तरुणांची बिनधास्तपणे जगण्याची सवय, आयुष्यातील मजा, मस्ती अशी सर्वप्रकारची धमाल या चित्रपटातून दिसते, ज्यामुळे रसिकांचे निखळ मनोरंजन होते.

‘मुकरे ’ ही कथा चार तरुण युवकांभोवती मिरते. ज्यात प्रत्येकाचं स्वप्न वेगळ असतं… लाली (मनोज सिंग) याची मोठ्या कॉलेजात जाऊन शिकण्याची इच्छा आहे तर जमरलला (अली मजल) संगीतात करिअर करायचंय. हनी (पुलकित सम्राट) आणि चोचा (वरूण शर्मा) या दोघांना पैसे कमवायचे आहेत. हनी आणि चोचा शालेय मित्र आहेत. चोच्याला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नांचा अर्थ लावून हनी लॉटरीचे तिकीट घेतो. चौघांचीही काही स्वप्ने आहेत ती पुर्ण करण्यासाठी ऐसा हवा आहे तो पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे चोच्याची स्वप्ने अस समिकरण चौघांनाही पटतं. त्यानंतर त्यांच्या स्वप्नाचा प्रवास खर्‍याअर्थाने सुरू होतो. पैसा मिळवण्याचे स्वप्न पुर्ण करायचे तर थोडा अधिकचा पैसा लागणार हे निश्‍चित. त्यासाठी ते भोली पंजाबन ( रिचा चड्डा) ची म्दत घेण्याचे ठरवतात आणि भोलीच्या जाळ्यात चांगलेच अडकतात.यातुन बाहेर पडण्याचा माग र्त्यांना सापडेल का? या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी ‘मुकरे ’ ला भेट द्यायलाच हवी.

‘मुकरे ’ या चित्रपटाचे दिग्दशक, लेखक मृगदीप सिंग लांबा यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने केले आहे. बेरोजगार तरूनाई हा तसा ’ चित्रपटांसाठी नविन विषय नाही, आपण या विषयावरचे अलिकडच्या काळात अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र या सर्व गर्दीत हा चित्रपट आपले वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी झाला आहे. निखळ मनोरंजन हाच हेतू दिग्दर्शकाने चित्रपटाची मांडणी केली आहे. बेरोजगार, आवारा मुलांना दिल्ली व परिसरात मुकरे म्हणुन ओळखले जाते, ती मुले नेमकी कशी असतात हे अतिशय सुंदर पधातीने मृणदिपने सादर केले आहे. लाली व जमर हे अपयशाचा सामना करत यशाकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत तर हनी व चोचा निर्लज्ज्ज प्रकारात मोडणारे आहेत. दोन परस्पर विरोधी स्वभावच्या मित्रांची कथा आपल्याला शेवटपर्यंत खिळवुन ठेवते.

चित्रपटात चार मित्र, त्यांच्या प्रेमिका अशी पात्रांची रेलचेल असली तरी पटकथाकाराने सर्वांना योग्य न्याय दिल्याने कोणत्याही पात्राचा गोंधळ उडत नाही. मनोज सिंग, अली मजल, पुलकित सम्राट, वरूण शर्मा हे चारही तरूण हे नवोदित अभिनेते आहेत. परंतु चित्रपटामध्ये कुठेही त्यांचा नवखेपणा जाणवलेला दिसून येत नाही. रिचा चड्डानंही सुंदर आभिनय केलाय. यामध्ये जे हास्यविनोद आहेत तेही साधेसोपेपणाने माडंलेले आहेत ज्याची लोकांना भुरळ पडते. यातील संवाद खूप मजेशीर आणि छान आहेत. राम संपत यांच संगीत चित्रपटाच्या कथेला साजेस आहे. कामाचा ताण दुर करून निखळ मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी मस्त, मनमौजी मुकरे अवश्य बघावा.

चित्रपट – मुकरे
निर्माता – रितेश सिधवानी, मरहान अख्तर
दिग्दर्शक – मृगदीप सिंग लांबा
संगीत – राम संपत
कलाकार – मनोज सिंग, अली मजल, पुलकित सम्राट, वरूण शर्मा, रिचा चड्डा

रेटिंग – * * *