शाहरूख – गौरीच्या घरी येतोय नवा पाहुणा

मुंबई दि.१४ – बॉलिवूडचा शेहनशहा शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी यांच्या कुटुंबात आता नवा पाहुणा येत असून त्याच्या स्वागतासाठी त्यांचा बंगला मन्नतवर गुपचूप पण जोरदार तयारी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शाहरूख- गौरी यांना दोन मुले आहेत. पैकी आर्यन हा १५ वर्षांचा तर सुहाना १३ वर्षांची आहे. नवा पाहुणा हा मुलगाच असून तो सरोगसी पद्धतीचा वापर करून जन्मास आला आहे. तिसर्याु मुलासाठी गौरी फारच आग्रही होती. त्यामुळे बॉलिवूड अभिेनेता आमीरखान आणि त्याची पत्नी किरण राव यांच्याप्रमाणेच सरोगसी मुलाचा विचार त्यांनी केला. त्यासाठी आमीरखानला मदत करणार्याे डॉक्टरांकडेच शाहरूख आणि गौरी गेले होते असेही समजते.

नव्या पाहुण्याबद्दलची बातमी फुटू नये यासाठी खूप खबरदारी घेतली होती. मात्र आता हा पाहुणा घरात येण्याची वेळ झाल्याने सुरू असलेली तयारी पाहून ही बातमी बाहेर आली आहे.

Leave a Comment