अमेठी दि.१४ – गेले दोन दिवस उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाच्या दौर्यावर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हे दोन मतदारसंघ आदर्श बनविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. हे दोन्ही मतदारसंघ विकासकामांच्या बाबतीत इतके आदर्श असतील की देशभरातून नागरिक येथे भेट द्यायला येतील असे त्यांनी सभेत बोलताना सांगितले.
अमेठीतील शुकुलबाजार येथील पोस्ट कार्यालयाच्या कोनशील समारंभासाठी राहुल येथे आले होते. ते म्हणाले की उत्तर प्रदेशात काँग्रेसला सत्ता नसल्याने येथील मतदारसंघांच्या विकासकामांना म्हणावी तशी गती आलेली नाही. मात्र तरीही अमेठी आणि रायबरेली हे आदर्श मतदारसंघ बनविले जातील. येथे उभारण्यात येत असलेल्या पेपरमिलमुळे १० हजार जणांना रोजगार मिळणार आहे असेही त्यांनी सांगितले.
फुरसतगंज येथे लवकरच ४० फूड प्रक्रिया उद्योग उभारले जात आहेत. जगदीशपूर येथे पेपरमिल तसेच हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, केटरिंग टेक्नॉलॉजी पार्कचे काम लवकरच सुरू होत असून या कामाना केंद्राच्या कॅबिनेटने नुकतीच मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यूपीतील शेतकर्यांटना थेट आंबा निर्यातीसाठी सुविधा दिल्या जातील असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
दोन दिवसांच्या या दौर्यात राहुल गांधी यांनी युवा र्कांग्रेस नेते तसेच प्रगतीशील शेतकरी यांच्या भेटी घेतल्या. शेतकर्यांंकडून ते आधुनिक शेतीसाठी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाची माहितीही त्यांनी घेतली तसेच त्यांना येणार्या अडचणीही विचारल्या. महिला बचत गटांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला असे समजते.