दुबईच्या पर्यटन वेबसाईटचा सचिन ’ब्रँड अॅम्बॅसिडर’

दुबई, दि.१३ – दुबईच्या मुसाफिर.कॉम’ पर्यटन वेबसाईटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची बुधवारी ब्रँड अम्बेसेडरपदी निवड केली. सचिनची कामाप्रतीची सचोटी आणि जगभरात सर्वोत्कृष्ट क्रीकेट खेळाडू असल्यामुळे त्याला कंपनीने आपल्या ब्रँडच्या प्रचारासाठी निवडले आहे. आम्हाला सचिन यासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहे असे कंपनी तर्फे सांगण्यात आले.

मुसाफिर.कॉम’च्या करारामध्ये टीव्ही, रेडिओ तसेच छापील माध्यमांशिवाय जागतीक स्तरावरचे मार्केटींगचाही समावेश आहे. 2007 मध्ये सुरु झालेल्या या वेबसाईटसाठी सचिन एक विशेष स्लोगनसुध्दा म्हणणार आहे.  या विषयी सचिन म्हणाला, मी या कंपनीसोबत जोडल्या गेल्याने मी खूपप आनंदी आहे. या माध्यमातून मी लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच संपूर्ण जग फिरण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकेन.

Leave a Comment